दुबई : आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला. अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटीलच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताला सामना जिंकणे सोपे झाले.
अ गटातील सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वीस षटकांत आठ बाद १०५ धावा केल्या. भारताने १८.५ षटकांत चार बाद १०८ धावा करत सामना सहा गडी राखून जिंकला. भारताची अरुंधती रेड्डी सामनावीर झाली. अरुंधतीने चार षटकांत १९ धावा देत पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना बाद केले.
अ गटातून खेळत असलेल्या भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. पण पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताने जिंकला. आता ९ ऑक्टोबर रोजी भारत श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. साखळी फेरीत दोन पैकी एक सामना जिंकलेला भारत गटात चौथ्या स्थानी आहे.