Wednesday, January 14, 2026 01:09:33 PM

Indian Navy Day : या कारणाने साजरा होतो 'नौदल दिन'; जाणून घ्या, 1971 च्या 'ऑपरेशन ट्रायडंट' विजयाची गाथा

भारतीय नौदल दिन हा दिवस केवळ एक औपचारिक उत्सव नसून, भारतीय नौदलाच्या शौर्याला, सामरिक क्षमतेला आणि सागरी सुरक्षेतील तिच्या अभूतपूर्व योगदानाला सलाम करण्याची संधी आहे. जाणून घेऊ, याविषयी अधिक माहिती..

indian navy day  या कारणाने साजरा होतो नौदल दिन जाणून घ्या 1971 च्या ऑपरेशन ट्रायडंट विजयाची गाथा

Indian Navy Day : संपूर्ण देशात आज 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस (Indian Navy Day) साजरा केला जात आहे. हा दिवस केवळ एक औपचारिक उत्सव नसून, भारतीय नौदलाच्या शौर्याला, सामरिक क्षमतेला आणि सागरी सुरक्षेतील तिच्या अभूतपूर्व योगदानाला सलाम करण्याची संधी आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धात (Indo-Pak War) ऑपरेशन ट्रायडंट (Operation Trident) अंतर्गत भारतीय नौदलाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो.

ऑपरेशन ट्रायडंट: 'नो-लॉस' ऑपरेशन
4 डिसेंबर 1971 रोजी, भारतीय नौदलाच्या मिसाईल बोटींनी (Missile Boats) रात्रीच्या वेळी पाकिस्तानच्या कराची बंदरावर (Karachi Harbour) हल्ला केला होता. या कारवाईत पाकिस्तानची तीन मोठी जहाजे उद्ध्वस्त झाली आणि कराची हार्बरमधील तेल डेपोला आग लागल्याने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, हा 'नो-लॉस ऑपरेशन' (No-Loss Operation) होता; कारण भारताने शत्रूचे मोठे नुकसान केले, पण आपली कोणतीही बोट गमावली नाही. या महान सैनिकी कामगिरीच्या आठवणीत हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो.

'ब्राउन वॉटर'कडून 'ब्लू वॉटर नेव्ही'कडे प्रवास
1971 मध्ये, भारतीय नौदल मुख्यत्वे किनाऱ्याजवळ कार्यरत असलेली 'ब्राउन वॉटर नेव्ही' (Brown Water Navy) होती. मात्र, तिथपासून ते आजपर्यंत नौदलाने अविश्वसनीय प्रगती केली आहे. आज भारत 'ब्लू वॉटर नेव्ही' (Blue Water Navy) आहे, म्हणजे अशी शक्ती जी समुद्राच्या मध्यभागी, दूर-दूरच्या देशांमध्ये आणि जागतिक सागरी मार्गांमध्येही ऑपरेशन्स (Naval Operations) करू शकते. स्वदेशी युद्धनौका (Indigenous Warships), विमानवाहू नौका INS विक्रांत आणि अत्याधुनिक पाणबुड्यांमुळे (Submarines) आत्मनिर्भरतेचे उदाहरण नौदलाने जगासमोर ठेवले आहे.

हेही वाचा - कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मोठा वाटा, मालकाकडून 1000 कर्मचाऱ्यांना मोफत लंडनवारी

आत्मनिर्भरतेतून जागतिक शक्तीकडे वाटचाल
1970 च्या दशकात भारत जहाजे परदेशातून (Foreign Countries) खरेदी करत असे, पण आज कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर, विशाखापट्टणम क्लास, शिवालिक आणि नीलगिरी क्लास फ्रिगेट तसेच कामोर्टा क्लास ASW कॉर्पेट यांसारखी सर्व जहाजे स्वदेशी डिझाइन आणि निर्मितीचे प्रतीक आहेत. INS विक्रांत (IAC-1) ही भारताची पहिली स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरियर (Aircraft Carrier) आहे. ही क्षमता केवळ अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि यूके यांसारख्या मोठ्या देशांकडेच आहे. INS अरिहंत (INS Arihant) अणुशक्ती संपन्न पाणबुडी (SSBN) आणि कलवरी क्लास स्कॉर्पीन सबमरीनमुळे भारताची समुद्री संरक्षक आणि शत्रूंचा नायनाट करण्याची क्षमता मजबूत झाली आहे.

'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर'ची भूमिका
भारतीय नौदल आता केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण हिंद महासागर क्षेत्राच्या सुरक्षेमध्ये योगदान देत आहे. ॲण्टी-पायरेसी ऑपरेशन (Anti-Piracy Operation) गल्फ ऑफ एडेन, मानवीय मदत आणि आपत्ती निवारण (HADR) तसेच फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांसारख्या नौदलांसोबत नियमित अभ्यास करून भारत आता 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर'ची (Net Security Provider) भूमिका बजावत आहे. 7,500 किमी पेक्षा जास्त लांबीची समुद्री सीमा आणि 1,200 हून अधिक बेटांची सुरक्षा नौदलासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपला 90% व्यापार सागरी मार्गाने (Trade via Sea Routes) होतो.

हेही वाचा - Tatkal Ticket New Rule: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम लागू; आता काउंटरवर OTP देणे अनिवार्य


सम्बन्धित सामग्री