Friday, December 13, 2024 12:08:43 PM

USA
अमेरिकेत गोळीबार, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू

अमेरिकेत भारतीय वंशाच्या दोन महिलांवर गोळीबार झाला. या घटनेत दोन पैकी एका महिलेचा मृत्यू झाला आणि दुसरी महिला गंभीर जखमी आहे.

अमेरिकेत गोळीबार भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू

न्यू जर्सी : अमेरिकेत भारतीय वंशाच्या दोन महिलांवर गोळीबार झाला. या घटनेत दोन पैकी एका महिलेचा मृत्यू झाला आणि दुसरी महिला गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक घटना न्यू जर्सीच्या कारटेरेट येथील रुझवेल्ट अॅव्हेन्यूजवळ घडली. गोळीबार करणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत पसरवणे आणि हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारताच्या दूतावासाने ट्वीट करून या घटनेची माहिती दिली आहे. 

              

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo