Wednesday, December 11, 2024 12:27:13 PM

Indian Railway
भारतीय रेल्वेचा विश्वविक्रम

भारतीय रेल्वेच्या गाड्यांमधून सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेने विश्वविक्रमाची नोंद केली.

भारतीय रेल्वेचा विश्वविक्रम

मुंबई : भारतीय रेल्वेच्या गाड्यांमधून सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेने विश्वविक्रमाची नोंद केली. भारतात एका दिवसात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला. ही माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

भारतीय रेल्वेने दिवाळी आणि छठ पर्वानिमित्त यंदा ७७०० पेक्षा जास्त विशेष गाड्यांची व्यवस्था केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७३ टक्के जास्त विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. रेल्वेच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


सम्बन्धित सामग्री





jaimaharashtranews-logo