दुबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा दिवस ब्लॅक संडे (Black Sunday) म्हणून ओळखला जाईल. कारण भारताला एकाच दिवशी तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. भारताला अंडर-19 आशिया चषकाच्या (U19 Asia Cup Final) अंतिम फेरीत गतविजेत्या बांगलादेशकडून (Banglades) पराभव स्विकारावा लागला आहे. भारताने टॉस जिंकत गोलंदाजी स्विकारली आणि गोलंदाजांनी त्याचे काम चोख बजावले. कारण बांगलादेशला यावेळी २०० धावांचा पल्लाही गाठता आला नाही. भारताने बांगलादेशला १९८ धावांत ऑल आऊट केले होते. विजयासाठी १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची २ बाद २४ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर भारताला लय सापडली नाही त्यांचा पराभव झाला. गतविजेत्या बांगलादेशने भारताचा अंतिम फेरीत ५९ धावांनी पराभव करत आशिया चषक पुन्हा आपल्या नावावर केला. यापूर्वी रविवारच्याच दिवशी भारताला ऑस्ट्रेलियात पुरुषांच्या कसोटी आणि महिलांच्या वनडे सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
बांगलादेशच्या १९९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा सलामीवीर आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) यावेळी फक्त एकाच धावेवर बाद झाला. भारताला यावेळी वैभव सूर्यवंशीकडून (Vaibhav Suryavanshi) मोठ्या अपेक्षा होत्या. कारण वैभव या स्पर्धेत सातत्याने धावा करता होता. पण वैभव यावेळी फक्त ९ धावाच कर शकला. त्यांनतरही भारताच्या विकेट्स ठराविक फरकाने पडत गेल्या आणि भारताचा ५९ धावांनी बांगलादेशने पराभव केला.
भारातच्या गोलंदाजांनी त्यानंतर टिच्चून मारा केला. पण बांगलादेशचा यष्टीरक्षक फरिदने ३९ धावा केल्या खऱ्या, पण भारताने बांगलादेशला २०० धावांचा पल्ला ओलांडू दिला नाही. भारताने बांगलादेशचा डाव १९८ धावांत आटोपला आणि विजयाचा भक्कम पाया रचला.