नाशिक : मनोज जरांगे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक केली. ही घटना नाशिकच्या सिडको भागात घडली.
जरांगे यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट (आयुर्वेद वैद्य) डॉ. विजय गवळी यांनी केली होती. या पोस्टचा निषेध म्हणून शाईफेक केल्याचे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जरांगे समर्थक मराठे असल्याचा दावा करत शाईफेक करण्यात आली. उत्तरादाखल डॉ. गवळी यांनी स्वतः मराठा असल्याचे सांगितले. डॉ. गवळी यांच्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. पण शाईफेकीची कृती योग्यच असल्याचा दावा केला.