आयपीएल 2026 स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली असताना इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव कधी पार पडणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं होत. 16 डिसेंबरला मिनी लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार असून त्याआधी सर्व संघांना कोणत्याही परिस्थितीत आपापल्या रिटेन्शन लिस्ट जाहीर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन केले आहे हे स्पष्ट होईल. यंदाच्या हंगामात एक टीम हवे तेवढे खेळाडू रिटेन करू शकते, त्यामुळे रिलीज होणाऱ्या खेळाडूंची संख्या प्रत्येक संघानुसार बदलू शकते.
मात्र, स्क्वाडमध्ये 18 ते 25 खेळाडूंची मर्यादा कायम असेल. तसेच एखाद्या संघाने सर्व खेळाडूंवर केलेला एकूण खर्च 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावा, अशी नियमावलीही लागू आहे. आयपीएल 2026 च्या लिलावादरम्यान अशा चर्चा सुरु होत्या की, रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यात व्यापार कराराद्वारे देवाणघेवाण केली जाऊ शकते. जडेजा राजस्थानमध्ये सामील झाला आहे आणि सॅमसन चेन्नईमध्ये सामील झाला आहे. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांच्या संभाव्य ट्रेडच्या चर्चेमुळे गेले काही दिवस सोशल मीडियावर गोंधळ पाहायला मिळाला. मात्र आता बीसीसीआयने याची पुष्टी केली आहे. तसेच आयपीएलने अधिकृत ट्रेड लिस्ट जाहीर केली आहे, ज्यामध्ये एकूण आठ खेळाडू आणि त्यांच्या किमतींचा तपशील आहे.
सर्व संघांसाठी संभाव्य रिलीज लिस्ट
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - राहुल त्रिपाठी, विजय शंकर, डेव्हॉन कॉनवे, दीपक हुडा, श्रेयस गोपाल, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, शेख रशीद.
गुजरात टायटन्स (GT) - जयंत यादव, दासून शनाका, करीम जन्नत, मानव सुथार, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रॅड.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, एनरिक नॉर्टजे, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, मनीष पांडे, चेतन साकारिया.
मुंबई इंडियन्स (MI) - रीस टोपले, कर्ण शर्मा, लिझाड विल्यम्स, रघू शर्मा, सत्यनारायण राजू, लिझाड विल्यम्स.
दिल्ली कॅपिटल्स (DC) - टी नटराजन, जेक फ्रेझर मॅकगर्क, हॅरी ब्रूक, डोनोवन फरेरा, दुष्मंथा चमीरा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) - लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, टिम सेफर्ट, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) - मोहम्मद शमी, अभिनव मनोहर, सचिन बेबी, राहुल चहर, विआन मुल्डर.
राजस्थान रॉयल्स (RR) - शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, नितीश राणा, क्वेना म्फाका, आकाश मधवाल, नांद्रे बर्गर, महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, फजलहक फारुकी.
पंजाब किंग्स (PBKS) - ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला ओमरझाई, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, काइल जेमिसन, प्रवीण दुबे, हरनूर पन्नू.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) - शामर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी, मोहसीन खान, आर्यन जुयाल, मयंक यादव, मॅथ्यू ब्रेट्झके.