Wednesday, November 19, 2025 06:39:39 AM

हिझबुल्लाचा प्रमुख ठार ?

हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हसन नसराल्ला इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हिझबुल्लाचा प्रमुख ठार

बैरुत : हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हसन नसराल्ला इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत इस्रायलकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. हिझबुल्लाकडूनही या प्रकरणी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

इस्रायलचा शेजारी असलेल्या लेबेनॉन या देशात हिझबुल्ला ही अतिरेकी संघटना सक्रीय आहे. सध्या लेबेनॉनमध्ये या अतिरेकी संघटनेचे राज्य आहे. याच हिझबुल्लाचे कंबरडे मोडण्यासाठी इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले आहेत. मागील काही दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये हिझबुल्लाचे अनेक अतिरेकी मारले गेले. ठार झालेल्या अतिरेक्यांमध्ये हिझबुल्लाचे काही प्रमुख अतिरेकीही आहेत. 


सम्बन्धित सामग्री