मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच राज्यातल्या भाजपा नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. यावेळी काही मुद्यांवर नड्डांनी राज्यातल्या नेत्यांची हजेरी घेतल्याचे समजते. यानंतर नड्डा यांनी चिंचपोकळी येथे जाऊन गणेश गल्लीच्या राजाचं आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.