मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी विराजमान गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, आमदार आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार, चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.