जळगाव: आज सकाळी सात वाजता जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला भीषण आग लागली. आग शोरूमच्या छतावर लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शोरूमचे मालक अशोक बेदमुथा यांनी सांगितले. आग लागल्यानंतर काहीच वेळात ती झपाट्याने वाढली आणि सोलर पॅनलच्या खाली असलेल्या अकाउंट विभाग व ॲक्सेसरीज विभागाला आगीने जळून खाक केले. यामुळे शोरूमला करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शोरूममध्ये झालेल्या या आगीच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने त्वरित कारवाई सुरु केली असून, बारा अग्निशामक बंब घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या आगीमुळे शोरूममध्ये असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्याने शोरूमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
शोरूमचे मालक अशोक बेदमुथा यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शरिरास धक्का बसलेल्या कर्मचार्यांना त्वरित मदतीची घोषणा केली आहे. अद्याप आगीची नेमकी कारणे समोर आलेली नाहीत, मात्र सोलर पॅनलने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत.
👉👉 हे देखील वाचा : देवरीत घडला चित्तथरारक अपघात, शीर वेगळं झालं; पोलिसांनी पुढे काय केले ?