जालना : ओबीसी आरक्षण चळवळीत सक्रिय नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी (21 सप्टेंबर) रात्री नीलम नगर परिसरात उभी असलेली त्यांची स्कॉर्पिओ कार अज्ञात व्यक्तीने पेटवली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
साक्षीदारांच्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने हातात कॅनमधील ज्वलनशील पदार्थ ओतून गाडीला आग लावली. काही क्षणांतच गाडीवरील कव्हर जळून गेलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.पण मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - Raj Thackeray and Uddhav Thackeray: तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार..., मनसेच्या संदीप देशपांडेंचा भाजपाला टोला
घटनेनंतर वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासायला घेतले आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
हेही वाचा - Income Tax on Sonu Sood : कोरोना काळात मदत केली पण...; अभिनेता सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर
या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वाघमारे यांच्या समर्थकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राज्यातील तणावपूर्ण वातावरणात या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, त्याच दिवशी जालना येथे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरही मराठा आंदोलकांनी हल्ला केला. पोलिस बंदोबस्त असूनही आंदोलकांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं. या घटनांमुळे जालन्यातील वातावरण आणखी तापलं आहे.