मुंबई : आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत विविध महत्त्वाचे मुद्दे, निवडणूक प्रक्रियेतील ताज्या घडामोडी आणि आगामी योजनांवर चर्चा झाली. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणाविषयी आपल्या पक्षाचे विचार व्यक्त केले.
विधिमंडळ गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड आणि मुख्य प्रतोद म्हणून रोहीत पाटलांची नेमणूक
जयंत पाटील यांनी सांगितले की, आज झालेल्या बैठकीत विधिमंडळ गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी मुख्य प्रतोद म्हणून रोहीत आर. आर. पाटलांची नेमणूक केली आहे. यासोबतच उत्तम जाणकर यांना देखील प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व नेमणुकींचा आदर व सर्वांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षांची टीका आणि इव्हीएमवर प्रश्नचिन्ह
पाटलांनी ईव्हीएम संदर्भात बोलताना, राज्यात मतदान ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. यावर ते म्हणाले, "जर मतदान वाढत असेल तर चिंतेची बाब आहे. ईव्हीएम मशिन हे कॅल्क्यूलेटर आहे. रात्री मतदान वाढले, हे कसं शक्य आहे?" यावर त्यांनी आरोप केला की, इव्हीएमची प्रक्रिया चुकीची आहे, आणि फॉर्म सीच्या बाबतीत काही विरोधकांच्या नकारात्मक मतांचा त्यांनी उल्लेख केला.
मर्कटवाडी भागातील ईव्हीएम किंवा बॅलेटवरील मुद्दे
उत्तम जाणकर यांच्या मतदार संघातील मर्कटवाडी भागात पुन्हा मतदान घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते म्हणाले की, या भागातील परिस्थिती लक्षात घेतली जात आहे आणि या भागात पुन्हा मतदान होणार आहे. तसेच, दोन मुलांना पकडल्याची घटना संदर्भात त्यांनी आरोप केला की, त्यांच्याकडे १४ फोन आणि १४ लॅपटॉप पकडले गेले होते. राजू खरे यांनी या मुलांना पकडून दिले होते, परंतु राजू खरे यांच्या विजयावर या मुलांना सोडून देण्यात आले. "निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात," अशी मागणी पाटलांनी केली.
निवडणूक आयोग आणि महिलांसाठी केलेली मागणी
जयंत पाटलांनी महिलांच्या सहभागाबाबतही मत मांडले. "६५ वर्षावरील महिलांचा समावेश होणे अपेक्षित होतेच, पण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांची संख्या वाढवायला काही हरकत नाही," अशी टिप्पणी त्यांनी केली. याशिवाय, सोयाबीन शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याची मागणी देखील त्यांनी केली. "कृषी क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात," असे ते म्हणाले.
सरकारकडून आश्वासन आणि शंभर टक्के कर्ज माफी
पाटलांनी सरकारकडून शंभर टक्के कर्ज माफी देण्याची मागणी केली. "महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याची परंपरा खंडीत होईल अशी आशा आहे," असे ते म्हणाले. तसेच, "सरकारकडे खूप पैसे आहेत, पण शपथविधी झाल्यावर लगेच पैसे मिळावे," अशी त्यांनी त्याच्या घोषणांवर प्रतिक्रिया दिली.
फडणवीस यांच्यावर विश्वास
आकस ठेवून काम न करण्याबद्दल जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला. "फडणवीस यांच्याकडून इतका मोठा विजय मिळाल्यानंतर कोणताही लहान मनाचा प्रकार त्यांच्याकडून अपेक्षित नाही," असे ते म्हणाले.
मनसेसोबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत चर्चेसाठी खुलं दार
मनसेला सोबत घेण्याबाबत त्यांनी विचारले असता, पाटलांनी सांगितले की, "निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबद्दल ज्या पद्धतीने आचारसंहिता बाबाची जी गोष्ट असते ती अस्तित्वातच नाही. लोकशाही वाचवण्यासाठी मनसेची इच्छा असेल आणि त्यांची देखील आमच्या सारखी मत असतील तर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी यावं."
अजित पवार यांच्यावर टीका
जयंत पाटलांनी अजित पवार यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. "महाराष्ट्र राज्यात कायदा आहे की, दोन मुलांपेक्षा जास्त मुले झाल्यास निवडणूक लढता येणार नाही. अजित पवार यांनी हा निर्णय घेतला होता, आता ते भेटले तर मी विचारणार की, मोहन भागवत यांचे मत घेतले जाईल का?" अशी विचारणा त्यांनी केली.