Tuesday, December 10, 2024 12:51:04 AM

Jayant Patil
'जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी'

राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी आहे; असे शरद पवार म्हणाले.

जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी

पुणे : राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी आहे; असे शरद पवार म्हणाले. राशप प्रमुख शरद पवारांनी हे वक्तव्य करुन भविष्यात पक्षाकडून जयंत पाटलांना आणखी एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शरद पवारांच्या मनातला मुख्यमंत्री उद्धव नाही तर जयंत पाटील आहेत; अशीही चर्चा सुरू झाली आहे. काल परवापर्यंत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणार या आशेवर असलेल्या संजय राऊतांना शरद पवारांच्या वक्तव्याने धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

जयंत पाटलांना गाजर कशाला ?

जयंत पाटील कधीही काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. 
दुय्यम भूमिका निभावून जयंत पाटील कंटाळलेत. 
जयंत पाटील स्वतःला सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व मानतात. 
संधी मिळाल्यास शरद पवार मुख्यमंत्री पदावर मुलीला बसवतील ही भीती. 
सुप्रियाच्या हाताखाली काम करण्याच्या भीतीने जयंत पाटील मनातून अस्वस्थ
सगळे सोडून गेले. निदान जयंत पाटील राहावेत यासाठी मुख्यमंत्री पदाची लालूच.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo