Saturday, February 08, 2025 06:36:02 PM

Karad supporters protest at the tower
कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील जलकुंभावर चढून आंदोलन केले होते.

कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील जलकुंभावर चढून आंदोलन केले होते. त्यानंतर मंगळवारी वाल्मिक कराडला न्याय द्या, अशी मागणी करत शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून कराड समर्थकांनी शोले स्टाईल आंदोलन केले. याप्रकरणी दोन दिवस परस्परविरोधी शोल स्टाईल आंदोलन झाल्याने येथील वातावरण पुन्हा तापले आहे  दरम्यान एका कराड समर्थकाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कराडच्या आईने ठिय्या आंदोलन केले आहे. त्यात त्यांची प्रकृती खालावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

वाल्मिक कराडला न्याय द्या, त्याच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी त्याच्या आई पारूबाई कराड यांनी पोलिस स्थानकासमोर आंदोलन केले. तेथे त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

 

हेही वाचा : वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी; केज कोर्टाने काय निर्णय दिला?

 

सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, मनोज जरांगे-पाटील यांनी परळी शहराची बदनामी सुरू केल्याचा आरोप करत कराडवरील खोटे गुन्हे रद्द करा, या मागणीसाठी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून कराड समर्थकांनी शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनानंतर कराड समर्थकानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.


सम्बन्धित सामग्री