Wednesday, November 13, 2024 08:22:12 PM

Karnataka Congress Chief Siddaramaiah Faces Crimin
कर्नाटकचे काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणात सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या नावावर ४ एकर जमीन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने विशिष्ट भागातील जमीन बेकायदेशीरपणे देण्याचे आरोप झाले आहेत.

कर्नाटकचे काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

नवी दिल्ली : कर्नाटकचे काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या भूखंड घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणाद्वारे सिद्धरामय्या यांच्या पत्नीला अनियमिततेने १४ भूखंड देण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या नावावर ४ एकर जमीन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने विशिष्ट भागातील जमीन बेकायदेशीरपणे देण्याचे आरोप झाले आहेत.

या संदर्भात प्रदीप कुमार, जे. अब्राहम, आणि स्नेहमयी कृष्णा यांनी तक्रार नोंदवली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यास १६ ऑगस्टला मंजुरी दिली होती. न्या. एम. नागप्रसन्न यांच्या एकल खंडपीठासमोर १९ ऑगस्टपासून याचिकेवर सहावेळा सुनावणी झाली. या प्रकरणाची चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी ही एक गंभीर आव्हान ठरू शकते.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo