कल्याण : रविवारी कसारा मार्गावर ८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बावीस लोकल फेऱ्या अंशतः रद्द होणार आहेत. ब्लॉकचा परिणाम ४९ मेल-एक्स्प्रेसवर होणार आहे. रविवारी २० ऑक्टोबर रोजी ३ वाजून २० मिनिटांपासून
सोमवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपर्यंत २२ तासांचा ब्लॉक यार्डातील रेल्वे मार्गांचा विस्तार करणे, नॉन इंटरलॉकिंग तसेच इतर यांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आसनगाव - कसारा दरम्यान अप-डाऊन एकही लोकल धावणार नाही.