Monday, September 16, 2024 07:07:57 AM

Wayanad Landslide
वायनाडमध्ये भूस्खलन, मृतांचा आकडा वाढला

केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले.

वायनाडमध्ये भूस्खलन मृतांचा आकडा वाढला

वायनाड : केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २७६ मृतदेह आढळले आहेत. यात ३० मुलांचा समावेश आहे. अद्याप २०० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. बेपत्ता असलेल्यांच्या जीवंत असण्याची शक्यता दिवसागणिक कमी होत आहे. वायनाडच्या दुर्घटनेत आढळलेल्या मृतदेहांपैकी ९६ जणांची ओळख पटवून त्यांचा ताबा नातलगांना दिला आहे. इतरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लष्कराने प्रशिक्षित श्वान आणि आधुनिक यंत्रणेच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. 


सम्बन्धित सामग्री