नाशिक : मकरसंक्रात जवळ आली कि येवलेकरांना वेध लागतात. ते पतंग उडवण्याचे येवल्यात तीन दिवस पतंग उडविण्याची धूम असते. अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांना मोठी मागणी आहे. येवल्यातील पंतग महोत्सव आणि येथील कारागिरांनी बनलवेल्या पतंग याची मोठी चर्चा केवळ येवल्यातच नाहीतर राज्यातही चर्चा असते. एप्रिल ते मे महिन्यापासून पतंग बनविण्यास सुरुवात केली जाते. पंतगांच्या नानाविध प्रकारांना येथे आकार मिळतो. कारागिरांनी आकार दिलेले हे पंतग आकाशात भरारी घेतात तेव्हा कारागिरांच्या आणि पतंगबाजी करणाऱ्यांच्या कल्पना क्षितिजाच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पतंगाला जे महत्व आहे तेच महत्व मांजा आणि फिरकीला अर्थात आसारीला आहे. पंतग उडवताना काटाकाटी करताना मांजावरील नियंत्रण आणि मांजाला ढील देताना फिरकीची करामत यागोष्टी जमल्या की समोरच्याची पतंग कापली गेलीच.पतंगाचे जसे अनेक प्रकार आहेत. तसेच अनेक प्रकार फिरकीचेही आहेत. फिरकी बनवणारे कारागिर त्यांच्या कौशल्याने या फिरकी बनवतात.
हेही वाचा : मकर संक्रांतीला बनवा तिळगुळाचे लाडू
एखादी गोष्ट अस्तित्वात नसली आणि त्याची कथा आपल्याला कोणी सांगितली तर तो पतंग उडवतोय अशी टिपणी केली जाते. मात्र पतंगांचा व्यवसाय हा हवेतील असला तरी त्यात मोठी उलाढाल आहे. गुजरातमध्ये पतंग व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. त्याखालोखाल महाराष्ट्रात पतंग व्यवसायात आर्थिक उलाढाल आहे. येवल्यात पतंगांची मोठी बाजारपेठ आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पतंगप्रेमी पतंग खरेदी करण्यासाठी येथे येतात.