Thursday, September 12, 2024 12:16:09 PM

Kolkata
कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी

कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले.

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी

कोलकाता : कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात ३१ वर्षांच्या डॉक्टरवर बलात्कार झाला. यानंतर डॉक्टरची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी तसेच साक्षीदारांच्या आणि पीडितेच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आवश्यक ते उपाय करावेत असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तपासाच्या प्रगतीचे वेळोवेळी अहवाल सादर करावे, असेही निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले. 
 

                    

सम्बन्धित सामग्री