पुणे : शहरात काल (बुधवार) मध्यरात्रीपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. पुणे शहरातील कोंढवा परिसरात महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि पुणे पोलिसांसह केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी मिळून एक मोठे संयुक्त 'सर्च ऑपरेशन' (Search Operation) सुरू केले आहे. हे सर्च ऑपरेशन दहशतवादी नेटवर्कशी (Terrorist Network) संबंधित संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून राबवण्यात आले आहे, असे सांगण्यात आले आहे.
कोंढवा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कारवाई
देशविरोधी कारवाया (Anti-national Activities) होण्याची शक्यता असलेले धागेदोरे पुणे पोलीस आणि एटीएसला मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोंढवा भागातील विविध 25 ठिकाणी एटीएस अधिकारी आणि पोलिसांनी छापेमारी (Raid) केली. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील अशीच कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Jijamata Mahila Sahakari Bank: RBI ची मोठी कारवाई! साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द
मोठा बंदोबस्त: कोंढवा परिसरात 350 हून अधिक पोलीस आणि एटीएसचे अधिकारी तैनात करण्यात आले असून, परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले आहे.
संशयित ताब्यात, कसून चौकशी सुरू
या संयुक्त सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. कोंढवा परिसराची दहशतवादी नेटवर्कशी संबंधित पार्श्वभूमी आहे; दोन वर्षांपूर्वी याच भागातून संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. पुन्हा एकदा काही संशयित देशविरोधी कारवाईची तयारी करत असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर यासंबंधीचा तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - Gautami Patil Gets Clean Chit: मोठी बातमी! अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट'; चालकावर गुन्हा दाखल