रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली. रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावर चिखल साचला आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालेली नाही. अनेक गाड्या खेड स्थानकाजवळ थांबवल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्या रद्द झाल्यामुळे आरक्षण करणारे अनेक प्रवासी नाराज झाले आहेत. तसेच रेल्वे मार्गावर खोळंबलेल्या गाड्यांमध्ये प्रवासी त्रासले आहेत. गाड्यांतील स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. रेल्वे प्रशासनाने एसटी महामंडळाशी समन्वय साधून विसेष बस सोडण्याची व्यवस्था केली आहे. या बसद्वारे प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही व्यवस्था केली तरी अद्याप अनेक प्रवासी खोळंबले आहेत.