सिंधुदुर्ग : कुडाळमधील सर्वात जुनी एमआयडीसी सध्या केवळ पंचवीस टक्केपेक्षा कमी सुरू आहे. मात्र सुरू असणाऱ्या उद्योगजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये विजेचा प्रश्न सर्वात मोठा असून काही प्रकल्प मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे एमआयडीसीला जास्तीत जास्त उद्योजक येण्यासाठी लवकरच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सहकार्याने कुडाळ एमआयडीसीला उर्जिता वस्ता आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर बजेट अधिवेशनापूर्वी उद्योग मंत्री यांच्या दालनात उद्योजक यांच्या समवेत बैठक घेऊन नवीन उद्योग येण्यासाठी व असणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आज कुडाळ एमआयडीसी येथे उद्योजक व एमआयडीसी संघटना प्रतिनिधी व विविध खात्याचे अधिकारी अशी एकत्रित बैठक घेण्यात आली. यातून सकारात्मक चर्चा झाली असून येत्या पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेऊन याचा आढावा घेतला जाणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
हेही वाचा : पुण्यात वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावे प्रॉपर्टी; नेमकं प्रकरण काय?