कुर्ला - 9 डिसेंबरच्या रात्री 9.00 ते 10.00 च्या दरम्यान कुर्ल्याच्या आंबेडकरनगर मध्ये संजय मोरे या बेस्ट बसच्या चालकाने 7 लोकांचा बळी घेतला. तसेच 40 हुन अधिक लोकं जखमी देखील झाले. बर्वे मार्गावर रात्री 9.30 च्या सुमारास ही जीवघेणी घटना घडली.
जखमींना राजावाडी, केईम, सायन, शताब्दी आणि इतर काही रुग्णालयात तातडीने दाखल केलं गेलं. ह्या घटनेनंतर मृतांच्या परिवाराला सरकारने 5 लाख रुपये आणि बेस्ट 2 लाख रुपये घोषित केले आहे. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा जो काही उपचार खर्च असेल ते बेस्ट आणि मुंबई महापालिका करेल.
50 वर्षीय संजय मोरे हा 332 क्रमांकाची बस चालवत होता. ही बस कुर्ल्यावरून साकीनाकापर्यंत जाणार होती. संजय मोरे हा ऑलेक्ट्रा कंपनीची ईलेक्ट्रीक बस चालवत होता. संजय मोरे यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला असं घटनांस्थळी असलेल्या लोकांचं मत आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता हे देखील स्पष्ट करण्यात झालेला आहे. अपघातानंतर चालकाला बाहेरकडून स्थानिकांनी चोप दिला. चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी घटनांस्थळी येऊन तातडीने अटक केली. चालकावर कलाम 105 110 118 118(2) अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला. बसने दुचाकी, रिक्षा, इको व्हॅन, पोलीस जीप, टॅक्सी या वाहनांना धडक दिली. धडक देऊन 100 मीटर दूर खेचतही घेऊन गेला. त्याचबरोबर त्याने चालत जाणाऱ्या काही जणांही उडवले. बसमध्ये काहीही दोष नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ब्रेक फेल झाला असेल हा दावा देखील खोटा ठरला. संजय मोरेला ईलेक्ट्रीक बस चालवण्याचा अनुभव नव्हता हे देखील उघडीस आले. मोरे हा डिसेंबर महिन्यातच कामावर रुजू झाला होता. फावल्या वेळात तो रिक्षादेखील चालवत होता असे देखील समोर आले. यामुळे बेस्ट प्रशासनदेखील प्रश्नांच्या घेऱ्यात आलं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट होते की गाडीचा वेग हा तशी 80 ते 90 होता. संजय मोरे हा मद्यपान करून बस चालवत असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. पण, मोरे शुद्धीत गाडी चालवत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं. या घटने नंतर कुर्ला बस स्टेशन 10 डिसेंबरला बराच वेळ बंद करण्यात आलं. यामुळे प्रवाश्यांची तारांबळ उडाली.
महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत देखील घोषित केली.
या घटनेनंतर बरेचसे प्रश्न पुढे येतात. अनुभवहीन चालकाला गाडी चालवायला देणं किती योग्य आहे ? चालक प्रवाश्यांच्या सुरक्षेचा विचार करतात का ? बेस्ट प्रशासनाचा चालकांवर वचक आहे का ? आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळतील का आणि मिळाली तर कधी मिळतील ?