नवी दिल्ली : आमिर खान, किरण राव आणि ज्योती देशपांडे निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा हिंदी चित्रपट भारताकडून ऑस्कर २०२५ स्पर्धेसाठी पाठवण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय भारतीय चित्रपट महासंघाने घेतला आहे. 'लापता लेडिज' या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांनी भूमिका साकारल्या आहेत.