Monday, September 16, 2024 07:52:04 AM

Ladki Bahin Yojana
मिळालेले तीन हजार तीन लाखांसारखे, लाडक्या बहिणींची प्रतिक्रिया

रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली..राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेली भावना.

मिळालेले तीन हजार तीन लाखांसारखे लाडक्या बहिणींची प्रतिक्रिया

मुंबई : मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन...घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज पैसे मागणार नाही..सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले...मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले..रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली..राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास १४ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरता नाही ती कायम आहे. योजनेकरीता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.


सम्बन्धित सामग्री