Thursday, September 12, 2024 12:12:17 PM

Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी मिळाली ओवाळणी

महायुती सरकारने आश्वासनाची पूर्तता केली. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी ओवाळणी मिळण्यास सुरुवात झाली.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी मिळाली ओवाळणी

मुंबई : महायुती सरकारने आश्वासनाची पूर्तता केली. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी ओवाळणी मिळण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक बहिणींच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा झाले आहेत. ज्यांनी जुलै महिन्यात अर्ज केला होता अशा लाभार्थ्यांना जुलै २०२४ आणि ऑगस्ट २०२४ या दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेनुसार लाभार्थ्यांचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा झाले आहेत. 


सम्बन्धित सामग्री