Friday, November 14, 2025 09:18:23 AM

'पवार + शिंदे = जरांगे'; लक्ष्मण हाकेंचा दावा

राशपचे शरद पवार अधिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे मनोज जरांगे असे गणित असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले

पवार + शिंदे  जरांगे लक्ष्मण हाकेंचा दावा

मुंबई : राशपचे शरद पवार अधिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे मनोज जरांगे असे गणित असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.जरांगेंना पवार आणि मुख्यमंत्री शिंदे लाल गालिचा अंथरत आहेत; असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. 

जरांगे जिथे सभा घेतील त्या ठिकाणी सभा घेणार असे लक्ष्मण हाके म्हणाले. राज्यात जास्तीत जास्त ओबीसी नेते निवडून यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हाकेंनी सांगितले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या शून्य प्रहर या कार्यक्रमात बोलत होते. संपादक प्रसाद काथे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देताना ओबीसी लोकप्रतिनिधी निवडून यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हाकेंनी सांगितले. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शून्य प्रहर या कार्यक्रमात बोलताना ओबीसी उमेदवारांना निवडून येण्यासाठी मदत करणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी जाहीर केले. 


सम्बन्धित सामग्री