Wednesday, January 15, 2025 07:18:48 PM

Beed
परळीतील मतदारसंघात राडा, नेत्याला मारहाण

बीड जिल्ह्यातील परळीतल्या एका मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला मारहाण केली.

परळीतील मतदारसंघात राडा नेत्याला मारहाण

बीड : बीड जिल्ह्यातील परळीतल्या एका मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला मारहाण केली. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट माधव जाधव मतदान केंद्रांवर पाहणी करत होते. ही पाहणी सुरू असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बघितले आणि मारहाण केली. माधव जाधव मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. हा आरोप अॅडव्होकेट माधव जाधव यांनी फेटाळला आहे. 

मारहाणीच्या घटनेमुळे परळीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. 


सम्बन्धित सामग्री