मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. माफी मागा नाहीतर कारवाई केली जाईल; असा इशारा नोटीसद्वारे मुख्यमंत्र्यांनी राऊतांना दिला आहे. याआधी रोखठोक या सदरातून राऊतांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त दावा केला होता. 'शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी वाटले.... दादांचे नेते पाडण्यासाठी शिंदेंनी पैसे वाटले...' असे दावे राऊतांनी त्यांच्या लेखातून केले. राऊतांच्या या दाव्यांवरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तीन दिवसात उत्तर द्या, अन्यथा कारवाई करू असा इशारा नोटीसद्वारे मुख्यमंत्र्यांनी राऊतांना दिला आहे.