Wednesday, December 11, 2024 11:30:20 AM

BJP Manifesto
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार

भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना बऱ्याच तरतूदी केल्या आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार


मुंबई : नुकताच भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्याचे नाव संकल्प पत्र आहे. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना बऱ्याच तरतूदी केल्या आहेत. वर्षभर शेतकरी अनेक अडचणींनी त्रस्त असतात. ह्याच शेतकऱ्यांना अडचणमुक्त करण्यासाठी भाजपाने जाहीरनाम्यात तरतूदी केल्या आहेत. 

भाजपाच्या संकल्प पत्रातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रूपये रक्कम दिली जाते. या रकमेतच वाढ करून १५ हजार रूपये दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवर आकारण्यात आलेला जीएसटी त्यांना अनुदानाच्या स्वरूपात परत देणार असल्याचे भाजपाने त्यांच्या संकल्प पत्रातून सांगितले आहे. 

शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६००० भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापन करणार असल्याचे देखील आश्वासन भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यातून दिले आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo