प्रयागराज (उत्तर प्रदेश): महाकुंभ 2025 च्या दुसऱ्या दिवशी प्रयागराजमध्ये 'अमृत स्नान' मध्ये सहभागी होण्यासाठी आखाड्यांची भव्य दिव्य मिरवणूक पाहायला मिळाली. ऋषिकेशमध्ये स्थित परमार्थ निकेतन आश्रमाचे आध्यात्मिक प्रमुख साधू चिदानंद सरस्वती यांनी या शुभ प्रसंगी 'भारत-पाकिस्तान एकता'चे आवाहन केले. त्यांनी महाकुंभाच्या महात्म्याचा उल्लेख करत असे म्हटले की, जे लोक विभाजनामुळे वेगळे झाले, ते आज याबद्दल दु:खी असतील.
सरस्वतींनी पाकिस्तानचा उल्लेख न करता म्हटले की, "महाकुंभ आणि मकर संक्रांतीचा हा महोत्सव असाच एक अमृत उत्सवाचा मेळा आहे. अगदी देवदेवतेसुद्धा या अमृताचा आस्वाद घ्यायला इच्छुक असतात.
भारताबाहेरील लोक असा विचार करत असतील की आम्ही देखील भारतात जन्म घेतलो असतो तर आज आम्ही सुद्धा या पवित्र स्नानात सहभागी झालो असतो. भारताच्या सीमारेषेवर बसलेले लोक काय विचार करत असतील की आम्ही वेगळे का झालो, असा काय केले आम्ही ? जे भारतात १२ तासांत १५ दशलक्ष लोक स्नान करतात. मला वाटते, अजून वेळ गेलेली नाही आणि या कुंभामुळेच हा भेद मिटावावा आणि आपला भारत अखंड भारत बनावा.अशी अपेक्षा चिदानंद सरस्वतीं स्वामी यांनी केली आहे."
👉👉 हे देखील वाचा : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह: पहिल्या शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी
महाकुंभ 2025 मध्ये मंगळवारी पहिल्या 'अमृत स्नान' दरम्यान १३.८ दशलक्ष भक्तांनी संगम येथे पवित्र स्नान केले, तसेच पहिल्या दिवशी सुमारे १६ दशलक्ष लोकांनी पवित्र स्नान केले होते.
चिदानंद सरस्वतींनी पुढे नदी संरक्षण आणि झाडे लावण्याची शपथ घेतल्याचे म्हटले आहे. "पौष पूर्णिमेचे स्नान केलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावर असलेलया आनंदाचे हावभाव अतुलनीय होते. पौष पूर्णिमा हा क्षण नदी आणि पर्यावरण संरक्षणासाठी आमचा समर्पित असावा. पंतप्रधान मोदींनी 'एक पेड़ माँ के नाम' म्हटले होते. तसेच प्रत्येकाने नदी संरक्षण आणि झाडे लावण्याची शपथ घ्यावी.असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते."
महाकुंभ 13 जानेवारी रोजी सुरू झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. महाकुंभाचे पुढील महत्वाचे स्नान दिनांक 29 जानेवारी (मौनी अमावस्या - दुसरे शाही स्नान), 3 फेब्रुवारी (वसंत पंचमी - तिसरे शाही स्नान) 12 फेब्रुवारी (माघी पूर्णिमा) आणि 26 फेब्रुवारी (महाशिवरात्रि) आहेत.
महाकुंभ १२ वर्षांनी साजरा होतो आहे आणि यामध्ये ४५० दशलक्ष पेक्षा अधिक भक्तांची उपस्थितीची शक्यता आहे. महाकुंभ 26 फेब्रुवारी रोजी संपन्न होईल.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.