Wednesday, December 11, 2024 11:13:02 AM

Waqf Board
वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा शासन निर्णय रद्द

राज्याच्या प्रशासनाने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी काढलेला शासन निर्णय रद्द केला आहे.

वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा शासन निर्णय रद्द

मुंबई : राज्याच्या प्रशासनाने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी काढलेला शासन निर्णय रद्द केला आहे. प्रशासकीय चूक असे कारण देत जारी केलेला शासन निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे. प्रशासनाच्या अल्पसंख्याक विभागाने शासन निर्णय काढला होता आणि त्यांनीच तो रद्द केल्याचे जाहीर केले आहे. 

राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर आदेश काढताही येत नाही आणि कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. पण हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला आहे. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर चूक दुरुस्त करण्यात आली. 

वक्फ बोर्डाबाबतचा शासन निर्णय जाहीर होताच राज्यातील हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फक्त एका समाजाला खूश करण्यासाठी पैशांचे वाटप करू नये. सर्वांना समान न्याय करावा, अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली. हिंदू संघटना रोष व्यक्त करत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना गडबड झाल्याची जाणीव झाली. यानंतर प्रशासकीय चूक झाल्याचे कारण देत वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo