Tuesday, December 10, 2024 10:44:45 AM

Maharashtra Politics
विधानसभा निवडणुकीत वाचाळवीरांची वायफळ बडबड

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत २८८ जागांसाठी मतदान होईल. निवडणुकीच्या निमित्ताने वाचाळवीरांची वायफळ बडबड सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत वाचाळवीरांची वायफळ बडबड

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत २८८ जागांसाठी मतदान होईल. निवडणुकीच्या निमित्ताने वाचाळवीरांची वायफळ बडबड सुरू आहे.

उद्धव ठाकरेंच्या सेनेतील अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना, आपल्याला इम्पोर्टेंड माल नको... अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. भाजपाच्या शायना एन. सी. यांनी परस्पर सामंजस्यातून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेनेकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एन. सी. यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर अरविंद सावंतांचे 'इम्पोर्टेंड माल' हे वक्तव्य आले. या वक्तव्याबाबत शायना एन. सी. यांनी नाराजी व्यक्त केली आणि पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात येताच मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला तरी कोणी दुखावले असल्यास माफी मागतो, असे सांगत अरविंद सावंतांनी वाद शांत करण्याचे प्रयत्न केले. 

उल्हासनगरमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी गद्दार भाजपासोबत आले की खुद्दार होतात असे वक्तव्य केले. यामुळे एकनाथ शिंदेंचे समर्थक असलेले स्थानिक शिवसैनिक नाराज झाले. अखेर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे सांगत प्रदीप रामचंदानी यांनी जाहीर माफी मागितली. 

शरद पवारांचे समर्थक असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या नेतृत्वात पाकिटमारांची टोळी कार्यरत असल्याची टीका केली. या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीकडून एकमेकांवर टीकाटीप्पणी सुरू झाली. हे सर्व शांत होत नाही तोच संजय राऊत यांच्या भावाने सुनिल राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या विक्रोळीतील टागोर नगरच्या उमेदवार सुवर्णा यांना बळीचा बकरा म्हटले. यानंतर सुनिल राऊत यांच्या विरोधात पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला. प्रचार सुरू झाल्यापासून शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून ठाकरे सेनेच्या दोन नेत्यांविरोधात आतापर्यंत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo