विजय चिडे, प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेत पंचवीस लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचे २५ लाख रुपये हिसकावण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. १५) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाचोड-पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात घडली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवून तब्बल 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.
या प्रकरणी भारत राजेंद्र रूपेकर वय 30 रा. नानेगांव ता. पैठण, विष्णु कल्याण बोधने वय 24 वर्ष रा. नानेगांव, सचिन विठठल सोलाट वय 25 वर्ष, रा. राहूल नगर, उत्तर जायकवाडी, पैठण, विशाल दामोधर चांदणे वय 24 वर्ष रा. अखातखेडा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर या आरोपीच्या आर्थिक गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण 31 लाख 56 हजार रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा -Sambhajinagar Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्या गर्भधारणेनंतर समोर आलं सत्य
दावरवाडी ता. पैठण येथील जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेची सेवानिवृत कर्मचारी गणेश आनंद पहिलवान हे अस्थाई कर्मचारी म्हणून नेणुकीस आहेत.दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.40 वाजेचे सुमारास मध्यवती सहकारी बॅकेच्या शाखा मार्केट यार्ड नारळा पैठण येथील शाखेतून रोख 25 लाख रूपये गोणी मध्ये त्यांचे स्कुटीवरून पैठण पाचोड रोडने घेऊन जात असतांना दावरवाडी शिवारात त्यांचे पाठीमागून एक काळया रंगाची मोटार सायकल व त्यावर दोन अज्ञात इसम तोंड बांधलेले यांनी त्यांना आवाज देवून थांबवले , यांची स्कुटी आडवून फिर्यादीस धाक दाखवून त्यांचेजवळील रोख 25 लाख रूपयांची गोणी जबरदस्तीने हिस्कावून पळून गेले याप्रकरणी पोलीस ठाणे पाचोड गुन्हा दाखल झाला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना स्वतः लक्ष देवून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शक सुचना दिल्या व तपासा दरम्यान वेळोवेळी आढावा घेतला.
हेही वाचा - Rohini Acharya : 'तुम्हाला चपलेनं मारलं जाईल..., त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढलं'; रोहिणी आचार्य यांचे कुटुंबियांबाबत धक्कादायक खुलासे
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटना ठिकाणी त्याचे पथकासह भेट देऊन घटनेची माहितीची काढून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, पैठण येथे जाऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा, पैठण येथील दैनंदिनी झालेले आर्थिक व्यवहार बाबत बैंक अधिकारी व स्टाफ यांचेकडे बारकाईने माहिती काढली असता त्यात असे दिसून आले की, भारत राजेंद्र रूपेकर रा. नानेगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर यांचे घरापासून दावरवाडी बैंक शाखा अवघ्या 2 कि. मी. अंतरावर असतांना देखील दुरच्या तो पैठण येथील बँके शाखेमध्ये आलेला असून तो मागील दोन वर्षापासून बँकेत व्यवहाराकरिता आलेला नाही, घटनेचे दिवशी बँकेत आलेला आहे. यावरून पथकास संशय निर्माण झाला, तसेच सदर इसम हा गुन्हेगारी पाश्वभूमीचा असल्याचे दिसून आले.
स्थानिक गुन्हा शाखा पथकाने कसोशिने शोध घेऊन सदर आरोपींना पैठण शहराचे परिसरात पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यांचे ताब्यातील स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-20 एफयू-3479 हीच्यामध्ये त्यांनी जबरीने चोरी केलेले बैंकेचे 25 लाख रोख रक्कमेसह पकडले व त्याचे ताब्यातून गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम 25 लाख रूपये व गुन्हयात वापरलेले वाहन स्वीफ्टकार 6 लाख व 8 मोबाईल फोन किं, 56 हजार असा एकूण 31,56,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपीतांना गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा आर्थिक विवंचनेमधून केल्याचे कबूल केले आहे.
सदरची कामगिरीपोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सपोनि, संतोष मिसळे, सपोनि, पवन इंगळे, पोह/विठठल डोके, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल चव्हाण, अशोक वाघ, राहूल गायकवाड, अनिल काळे, सनि खरात, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली असून पुढील अधिक तपास पोस्टे पाचोड येथील सपोनि सचिन पंडीत हे करत आहेत.