शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी सामाजिक जीवनापासून पुढील दोन लांब राहणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी सोशल मिडीयावर दिली आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती, जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं. मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत.
पुढे त्यांनी लिहिले की, "वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागणार आहे. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या", असे त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळासह त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अशातच आता आमदार आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासाठी पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, "काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे". दरम्याने आदित्य ठाकरेंच्या या पोस्टची सर्वत्र सुरू आहे.