Saturday, February 15, 2025 06:55:44 AM

Maharashtra Sadan
'काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारणार'

महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.

काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील अडीच एकर जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री