Wednesday, December 11, 2024 12:31:02 PM

Maharashtra Young Voters
महाराष्ट्रात २२ लाख २२ हजार १८ ते १९ वयोगटातील मतदार

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार

महाराष्ट्रात २२ लाख २२ हजार १८ ते १९ वयोगटातील मतदार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांनी नोंदणी केली आहे. यात १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. 

राज्यातील एकूण मतदारांमध्ये पाच कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यातील १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ मतदारांमध्ये पुरुष मतदार १२ लाख ९१ हजार ८४७, ९ लाख ३० हजार ७०४ महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३ इतकी आहे. तसेच २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२, महिला मतदार ८६ लाख ८० हजार १९९ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २३९४ इतकी आहे. तर ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११ लाख २१ हजार ५७७, महिला मतदार १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९ इतकी आहे.

४० ते ४९ या वयोगटातील एकूण २ कोटी ७ लाख ३० हजार ५९८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ७ लाख ४९ हजार ९३२, महिला मतदार ९९ लाख ७९ हजार ७७६ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ८९० इतकी आहे. ५० ते ५९ या वयोगटातील एकूण १ कोटी ५६ लाख १० हजार ७९४ मतदारांमध्ये पुरुष मतदार ७८ लाख ५४ हजार ०५२, महिला मतदार ७७ लाख ५६ हजार ४०८ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३३४ इतकी आहे. ६० ते ६९ या वयोगटातील एकूण ९९ लाख १८ हजार ५२० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५० लाख ७२ हजार ३६२, महिला मतदार ४८ लाख ४६ हजार २५ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३३ इतकी आहे.

वर्ष ७० ते ७९ या वयोगटातील एकूण ५३ लाख ५२ हजार ८३२ मतदारांमध्ये पुरुष मतदार २६ लाख ३६ हजार ३४५, महिला मतदार २७ लाख १६ हजार ४२४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६३ इतकी आहे. ८० ते ८९ या वयोगटातील एकूण २० लाख ३३ हजार ९५८ मतदारांमध्ये पुरुष मतदार ९ लाख १५ हजार ७९८, महिला मतदार ११ लाख १८ हजार १४७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३ इतकी आहे. ९० ते ९९ या वयोगटातील एकूण ४ लाख ४८ हजार ३८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ लाख ९७ हजार ३२३ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५० हजार ७१५ इतकी आहे.

वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या १०० ते १०९ या वयोगटातील एकूण ४७ हजार १६९ मतदारांमध्ये पुरुष मतदार २० हजार ९८३, महिला मतदार २६ हजार १८४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ आहे. ११० ते ११९ या वयोगटातील एकूण ११३ मतदारांमध्ये पुरुष मतदार ५२ तर महिला मतदारांची संख्या ६१ आहे. तर १२० हून अधिक वयोगटातील ११० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५६ तर महिला मतदारांची संख्या ५४ आहे.

विशेष वयोगटामध्ये ८५ ते १५० वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदारांमध्ये ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष, ६ लाख ९८ हजार ०२२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार आहेत. तर १०० ते १५० वयोगटामधील एकूण ४७ हजार ३९२ मतदारांमध्ये २१ हजार ९१ पुरुष, २६ हजार २९९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स)  एकूण १ लाख १६ हजार १७० मतदारांमध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष तर ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.

राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo