Konkan Railway Mahashivratri 2026 Special Train: यंदाची महाशिवरात्री कोकणात साजऱ्या करणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने मोठी सुखवार्ता दिली आहे. रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेवर 6 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, सणानिमित्त घराकडे जाणाऱ्यांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
मुंबई-सावंतवाडी विशेष गाडीचे वेळापत्रक आणि फेऱ्या
ट्रेन क्रमांक: 01129 (मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड) आणि 01130 (सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT).
फेऱ्यांच्या तारखा: शनिवार 14 February 2026, गुरुवार 19 February 2026 आणि शनिवार 21 February 2026.
मुंबईहून सुटण्याची वेळ: मध्यरात्री 12:20 वा. (पोहोचण्याची वेळ: दुपारी 12:30 वा. त्याच दिवशी).
सावंतवाडीहून सुटण्याची वेळ: सायंकाळी 05:20 वा. (पोहोचण्याची वेळ: पहाटे 04:05 वा. दुसऱ्या दिवशी).
प्रमुख थांबे (Stoppages)
या विशेष ट्रेनला खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:
मुंबई/उपनगर: दादर, ठाणे, पनवेल.
रायगड: पेण, रोहा, माणगाव, वीर.
रत्नागिरी: खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड.
सिंधुदुर्ग: वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
हेही वाचा - Holi Special Trains: होळीसाठी रेल्वेचं स्पेशल गिफ्ट! यंदा धावणार 1,409 विशेष गाड्या; कन्फर्म तिकीट मिळणं होणार सोपं, पाहा यादी
गाडीला किती डबे असतील? (Coach Composition)
प्रवाशांच्या सुविधेसाठी या ट्रेनला एकूण 22 डबे जोडण्यात आले आहेत:
AC Coaches: 01 डबा (एसी टू-टियर), 05 डबे (एसी थ्री-टियर).
Sleeper Class: 10 डबे.
General Class: 04 डबे.
इतर: 02 एसएलआर (SLR) कोच.
बुकिंग कधीपासून सुरू होणार?
तुम्हीही महाशिवरात्रीला कोकणात जाण्याचे नियोजन करत असाल, तर तिकीट बुकिंगसाठी तयार राहा. ट्रेन क्रमांक 01130 चे बुकिंग 10 फेब्रुवारी 2026 पासून सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम्स (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत चौकशी वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात खाजगी बसच्या वाढीव दरांपासून वाचण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्या हा प्रवाशांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत.
हेही वाचा - Rajmata Jijau Buses : एसटीच्या ताफ्यात आता 'राजमाता जिजाऊ' बस; पाहा कधीपासून सुरू आणि काय आहेत खास सुविधा