Sunday, March 08, 2026 12:41:33 PM

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला मंदिरातून घरी आणा 'या' 3 वस्तू; नेहमी सुख-समृद्धी नांदेल, तिजोरी राहील सदैव भरलेली

महाशिवरात्रीला भगवान शिवाचे पूजन करून झाल्यानंतर काही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. जाणून घेऊ, या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कशा घरी आणाव्यात..

mahashivratri 2026  महाशिवरात्रीला मंदिरातून घरी आणा या 3 वस्तू नेहमी सुख-समृद्धी नांदेल तिजोरी राहील सदैव भरलेली

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीचा पवित्र सण हा प्रत्येक शिवभक्तासाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा असतो. हिंदू पंचांगानुसार, पुढील रविवारी अर्थात 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. याच दिवशी भगवान शिव पहिल्यांदा शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी शिवलिंगाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख-समृद्धीचा वर्षाव होतो. तसेच, ग्रहांचे दोषही दूर होतात.

मुहूर्त आणि विधी (Mahashivratri 2026 Muhurat)
यावर्षी चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 5:04 वाजता सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 5:34 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 15 फेब्रुवारीलाच महाशिवरात्र साजरी होईल. पूजेचा मुख्य मुहूर्त सायंकाळी 6:11 ते रात्री 9:22 वाजेपर्यंत असेल. या काळात भक्तांनी रात्रभर जागरण करून 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप केल्यास त्याचे अनंत फळ मिळते.

या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीचे दर्शन घेणे आणि पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभफलदायी असते. महादेवाला अभिषेकही जरूर करावा. मनोभावे नमस्कार करून मंदिरातून परताना काही वस्तू सोबत आणाव्यात. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.  या वस्तूंमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी नांदते. जाणून घेऊ, महाशिवरात्री कोणत्या दिवशी साजरी केली जाईल, शुभमुहूर्त आणि महादेवाची पूजा करून कोणत्या वस्तू घरी आणाव्यात.

'या' वस्तूंनी अभिषेक करा; होईल इच्छापूर्ती
महाशिवरात्रीला शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूला आपले वेगळे फळ मिळते:
पाणी: केवळ एक तांब्या पाणी अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि मनाला शांती मिळते.
दूध: आर्थिक स्थैर्य आणि आरोग्यासाठी कच्च्या दुधाचा अभिषेक करावा.
दही: मानसिक ताण कमी करण्यासाठी दह्याचा अभिषेक अत्यंत गुणकारी आहे.
मध: वैवाहिक सुखासाठी आणि आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मधाने अभिषेक करा.
तूप: मुलांच्या आरोग्यासाठी किंवा मुलांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुपाचा अभिषेक करावा.
काळे तीळ: वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी काळ्या तीळाचा वापर करावा.

हेही वाचा - Bharadi Devi Yatra: निवडणुकीचा निकाल आणि भराडी देवीची जत्रा एकाच दिवशी; आंगणेवाडीच्या जत्रेला मुख्यमंत्र्यांची हजेरी

पूजेनंतर मंदिरातून घरी आणायच्या खास वस्तू
अभिषेक आणि पूजेनंतर मंदिरातून काही खास गोष्टी घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. या गोष्टींमुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही, असा भाविकांचा विश्वास आहे. तेव्हा, अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक म्हणून खालील गोष्टी घरी आणू शकता. 
बेलपत्र: भगवान शिवाला अर्पण केलेले एखादे बेलपत्र घरी आणून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की, यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि पैशाचा ओघ कायम राहतो.
पार्वती मातेचा आशीर्वाद: महाशिवरात्रीला शिव आणि पार्वतीचे मिलन झाले होते. म्हणून मंदिरातील पार्वती मातेला अर्पण केलेल्या बांगड्या, चोळी किंवा हळद-कुंकू यांपैकी काही वस्तू आपल्या सोबत घरी आणाव्यात. विवाहित महिलांनी हे परिधान केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि पतीचे आरोग्य आणि आयुष्य वाढते. तसेच, त्यांच्या स्वतःच्याही मानसिकतेत सकारात्मक बदल होतात.
अभिषेकाचे पाणी: शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यापैकी थोडे पाणी एका भांड्यात गोळा करून घरी आणा. हे तीर्थ संपूर्ण घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर घरात कोणी आजारी असेल, तर त्यांच्यावर हे पाणी शिंपडल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते.

या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा होईल दूर
महाशिवरात्रीची रात्र ही केवळ पूजेची नसून आत्मिक उन्नतीची संधी असते. या दिवशी उपवास धरल्याने मन आणि शरीर शुद्ध होते. पूजेनंतर घरी आणलेले 'शिव तीर्थ' (पाणी) आपल्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात शिंपडा. यामुळे वास्तू दोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक लहरींचा संचार होतो. भगवान शंकर हे अल्प पूजेनेही प्रसन्न होणारे देव आहेत, त्यामुळे केवळ श्रद्धेने घेतलेले दर्शनही तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकते.

हेही वाचा - Pooja Phool Niyam : तुम्ही तुमच्या पूजा थाळीत चुकीची फुले ठेवत आहात का? जाणून घ्या

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री