Wednesday, December 11, 2024 11:43:56 AM

Mahayuti Meeting
महायुतीची शुक्रवारची बैठक रद्द, शिंदे गावी जाणार

महायुतीची शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी होणार असलेली बैठक रद्द झाली आहे.

महायुतीची शुक्रवारची बैठक रद्द शिंदे गावी जाणार

मुंबई : महायुतीची शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी होणार असलेली बैठक रद्द झाली आहे. ही बैठक दिल्लीतून फोन आल्यानंतर एक किंवा दोन डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीहून मुंबईत आले. हवा पालट आणि विश्रांती घेण्यासाठी तसेच काही इतर कामांसाठी ते गावी जात आहेत. एकनाथ शिंदे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे गावचे निवासी आहेत. हे गाव महाबळेश्वर तालुक्यात आहे. गावात एकनाथ शिंदेंची शेती आहे. शेतीची कामं करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी व्यवस्था लावली आहे. पण अधूनमधून गावी जाऊन शेतीच्या कामात रमणे त्यांना आवडते. 

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना कामाचा ताण हलका करण्यासाठी एकनाथ शिंदे अधूनमधून गावात जायचे. शेतीच्या कामात रमायचे. आता पुन्हा एकदा ते गावी जात आहेत. याआधी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीस आणि अजित पवार मुंबईत परतले. काही तासांनंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले. शिंदे मुंबईत परतल्यानंतर पुढील काही तासांत मुंबईत महायुतीची बैठक होईल असा अंदाज व्यक्त होत होता. पण एकनाथ शिंदेंनी गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीची शुक्रवारची नियोजीत बैठक रद्द झाली आहे. आता महायुतीची बैठक दिल्लीतून फोन आल्यानंतर एक किंवा दोन डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल

  1. एकूण 288 जागा
  2. महायुती 230 जागांवर विजय
  3. भाजपा 132 जागांवर विजय
  4. शिवसेना 57 जागांवर विजय
  5. राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
  6. महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
  7. उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
  8. काँग्रेस 16 जागांवर विजय
  9. शरद पवार गट 10 जागांवर विजय
  10. इतर 12 जागांवर विजय

जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo