मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास भाजपा नेते दवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते मुंबईत महाराष्ट्र प्रदेश भाजपा मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होत. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार, असेही ते म्हणाले. नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. आशिष शेलार यांनी ही माहिती जाहीररित्या दिली आहे. ती पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे भाजपाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मलिकांचा प्रचार करणार नसल्यामुळे सरकार आले तर त्यांना मंत्री करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस आमच्यातले नाहीत, असे त्यांनी सांगितले.