Thursday, December 12, 2024 07:28:17 PM

Mahayuti
महायुतीला धक्का बसणार

शिउबाठामध्ये भरती शुक्रवारी होणार आहे.

महायुतीला धक्का बसणार

मुंबई : शिउबाठामध्ये भरती शुक्रवारी होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादीचे आबा साळुंखे यांचा संध्याकाळी चार वाजता मातोश्री येथे पक्षप्रवेश होणार आहे. तर भाजपच्या राजन तेली यांचा पाच वाजता होणार प्रवेश होणार आहे. भाजपाचे राजन तेली हाती मशाल घेणार आहेत. 
तेलींच्या कार्यालयातील भाजपा नेत्यांचे फोटो देखील हटवले. तसेच चिंचवड येथील राष्ट्रवादीचे मोरेश्वर बोंडवे यांचा सहा वाजता होणार प्रवेश आहे.

कोण आहेत राजन तेली ? 


राजन तेली नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते
तेली राणेंसोबत शिवसेनेते होते, राणेंनी शिवसेना सोडल्यावर तेली यांनीही शिवसेना सोडली
तेली यांनी नंतर भाजपात प्रवेश केला, देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेता म्हणून तेली यांची ओळख
राजन तेली यांना सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा होती
शिवसेनेचे दीपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी देण्याला तेली यांचा विरोध
सावंतवाडी मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी तेली आग्रही
शिउबाठाचे सावंतवाडीचे उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo