Friday, February 07, 2025 10:21:40 PM

Mahayuti won in Maharashtra
महायुती 200 पार, भाजपाची सर्वोत्तम कामगिरी

महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने राज्यातली आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

महायुती 200 पार भाजपाची सर्वोत्तम कामगिरी

मुंबई : लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा विविध कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प यांचा फायदा भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला मिळाला आहे. महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने राज्यातली आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महायुती 217 जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा 129, शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. स्पष्ट बहुमत मिळवल्याची जाणीव होताच मविआच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

भाजपा - 2014 - 122 जागांवर विज
भाजपा - 2019 - 105 जागांवर विजय

शिवसेना 2014 - 63 जागांवर विजय
शिवसेना 2019  - 41 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस 2014 - 41 जागांवर विजय
राष्ट्रवादी काँग्रेस 2019 - 54 जागांवर विजय

भाजपाने यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 148 जागांवर उमेदवार जाहीर केले आणि चार जागांवर मित्र पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. ताज्या आकडेवारीनुसार भाजपाचे 148 पैकी 129 उमेदवार आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते आघाडीवर आहेत.

मोदी संध्याकाळी दिल्लीत भाजपा मुख्यालयात येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत संध्याकाळी सात वाजता भाजपाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान मोदी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालावर तसेच ठिकठिकाणच्या पोटनिवडणुकांतील निकालांवर बोलतील.


सम्बन्धित सामग्री