Surat Maid Buys Flat: वाढत्या मालमत्तेच्या किमती आणि ईएमआयच्या ताणामुळे अनेकांसाठी घर खरेदी करण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. पण गुजरातमधील सूरत शहरातील एका मोलकरणीने केवळ आपले हे स्वप्न पूर्णच केले नाही, तर लाखो लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या मोलकरणीने तब्बल 60 लाख किमतीचा फ्लॅट विकत घेतला आणि त्यासाठी फक्त 10 लाखांचे कर्ज घेतले. एवढेच नव्हे तर तिने नवीन घरासाठी 4 लाखांचे फर्निचरही विकत घेतले.
हेही वाचा - Fox Eyes Surgery : शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीनंतर ब्राझीलियन इन्फ्लुएन्सरचा मृत्यू; डॉक्टरवर आधीच केला होता खटला दाखल
ही प्रेरणादायी बातमी नलिनी उनगर नावाच्या महिलेनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली. नलिनी यांनी म्हटलं आहे की, माझ्या मोलकरणीने जेव्हा मला सांगितले की तिने 60 लाखांचा फ्लॅट घेतला आहे, तेव्हा मी काही क्षणांसाठी नि:शब्द झाले. तिच्या आर्थिक नियोजनाची समज पाहून मी थक्क झाले. नलिनीच्या मते, ही त्या मोलकरणीची पहिली मालमत्ता नव्हती. तिचं गुजरातमधील वेलांजा गावात आधीच एक दुमजली घर आणि एक दुकान आहे, जे ती भाड्याने देते. तिने अनेक वर्षांपासून काटकसर करून बचत केली आणि केवळ 10 लाखांचे कर्ज घेत बाकीची रक्कम स्वतःच्या बचतीतून भरली.
हेही वाचा - Divorce Celebration: घटस्फोटानंतर तरुणाने केलं जंगी सेलिब्रेशन, आईने दुधाचा अभिषेक घातला अन्...
या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांनी तिच्या शिस्तबद्ध बचतीचं आणि आर्थिक नियोजनाचं कौतुक केलं. काही वापरकर्ते मात्र सुरतमधील 3 बीएचके फ्लॅट 60 लाखांत कसा मिळू शकतो? यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तथापी, नलिनीने प्रत्युत्तर देताना लिहिले, 'मी तिच्या यशाने आनंदी आहे. पण समाज म्हणून आपण बहुधा असा समज करून घेतो की अशा नोकऱ्या करणारे लोक गरीब असतात. प्रत्यक्षात ते आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक समजूतदार असतात. आपण फोन, कपडे, प्रवासावर खर्च करतो. पंरतु, ते अधिक बचत करतात.' ही घटना दाखवते की दृढनिश्चय, संयम आणि नियोजनाने कोणतही स्वप्न साकार होऊ शकतं.