मुंबई : मुंबईला जगाचे शक्तीकेंद्र करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. मुंबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते २९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी झाली.
ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी - खर्च १६ हजार ६०० कोटी रुपये
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी - ६३०० कोटी रुपये
कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेची तसेच तुर्भे येथील गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नव्या फलाटांचे लोकार्पण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र. १० आणि ११ चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ - ५६०० कोटी रुपये
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
स्वनिधी योजनेअंतर्गत ९० लाख कर्ज - मोदी
मुंबईत दीड लाख नागरिकांना स्वनिधीचा फायदा - मोदी
खोटा प्रचार करणारे भारताच्या विकासाचे शत्रू - मोदी
वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणतोय - मोदी
पंतप्रधानांनी वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा
पंढरपूरच्या विठोबाला कोटी कोटी नमन - मोदी
दहा वर्षात राष्ट्रीय महामार्गांची संख्या तिप्पट - मोदी
तीर्थस्थळांचाही विकास करू - मोदी
वारीसाठी सुविधा देऊ - मोदी
पालखी मार्ग लवकरच पूर्ण होणार - मोदी
भारताला विकसित करण्यात महाराष्ट्राची भूमिका मोठी - मोदी
अटल सेतूविरोधात अफवा पसरवल्या - मोदी
प्रत्यक्षात अटल सेतूमुळे वेळ आणि इंधनाची बचत - मोदी
महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आणि समृद्ध भविष्य - मोदी
देशाच्या आर्थिक राजधानीला जगाचे शक्तीकेंद्र बनवू - मोदी
तिसऱ्या सरकारचे लोकांनी स्वागत केले - मोदी
रालोआ देशाला स्थैर्य देईल - मोदी
तिसऱ्या काळात तिप्पट वेगाने काम - मोदी
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून
'या प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळेल'
'तरुणांना या प्रकल्पांमधून रोजगार मिळेल'
'दहा लाखांहून अधिक तरुणांना रोजगाराची संधी'