सिंधुदुर्ग : तळ कोकणात तापमानाचा पारा घसरला. 10 ते 11 अंश निचाकित तापमान याचा परिणाम आंबा झाडास मोहर मोठ्या प्रमाणात येण्यावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आठ दिवस अगोदरच थंडीला सुरुवात झाली आहे. आंब्याला मोठ्या प्रमाणात फुलोरा आला असून काही ठिकाणी फळधारणा ही झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी सुखावले आहेत. कोकणातील आंबा बागायतदारांना थंडी फायदेशीर ठरत आहेत.
किनारी भागातील आंबा झाडांना किनारी भागातून वाहणारे थंड वारे हे क्षारयुक्त असतात. त्यामुळे वाढणारी थंडी व वारे याचा ताण पडून आंबा झाडाला मोहर मोठ्या प्रमाणात येत आहे. मागील काही दिवसापासून पडणारी थंडी यामुळे किनारी भागातील आंबा झाडांना फळधारणा झाली आहे. फळधारण झालेल्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने मोहोर व फळाची निगा राखल्यास जानेवारी अखेर ते फेब्रुवारी महिन्यात पहिल्या पंधरवड्यात आंबा खवय्यांना आंबा खायला मिळेल. वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात आंबा झाडांना मोहर व फळधारणा झाली आहे. आंबा बागायतदार शेतकरी महेश सामंत यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.
आंब्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण
आंबा पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ उष्ण तापमान, पर्जन्यमान आणि आर्द्रता राहिल्यास आंबा पिकाची सतत शाकीय वाढ चालू राहते.