नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे आरोपी मनीष सिसोदिया यांना जामीन दिला. सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सीबीआयने अटक केले. नंतर ९ मार्च २०२३ रोजी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना सीबीआयकडून ताब्यात घेऊन अटक केले. सिसोदिया वारंवार जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना जामीन मिळत नव्हता. सिसोदिया यांच दिल्लीच्या तिहार तुरुंगात रवानगी झाली. आता जामीन मिळाल्यामुळे जवळपास सतरा महिन्यांनंतर सिसोदियांना दिलासा मिळाला आहे. याआधी एकदा पत्नीची तब्येत बरी नसल्यामुळे आणि एकदा लग्न समारंभासाठी सिसोदिया यांना मर्यादीत काळासाठी जामीन मिळाला होता.