दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवार दिनांक 26 डिसेंबर या दिवशी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ICU मध्ये कक्षात नेण्यात आलं आणि उपचार करण्यात करण्यात आले. मात्र, रात्री 9.51 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशविदेशातून शोक व्यक्त करण्यात आला. देशातील सर्व मोठ्या नेत्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली.
शनिवार (28 डिसेंबर) या दिवशी त्यांचावर निगमबोध घाट येथे अंतिम संस्कार झाले. देशातील प्रमुख तसेच वरिष्ठ नेते अंतिम विधीला उपस्थित होते. सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात नेण्यात आले. तिथे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयातून त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर आणण्यात आले. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित होते. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारंभास उपस्थित राहिले.
डॉ. मनमोहन सिंग यांचं व्यक्तिमत्व हे सगळ्यांनाच आवडणारं होत. त्यांचा अंतिम संस्काराचा वेळी ज्या रस्त्यावरून त्यांचं पार्थिव नेण्यात आले होते तिथे लोकांची गर्दी बघायला मिळाली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांचा दुखावटा झहीर केला. तसेच काँग्रेस पक्षाने देखील जाहीर केले आहे की पक्षाचे सर्व शासकीय कार्यक्रम, त्यात फाउंडेशन डे साजरा करण्यासह, पुढील सात दिवसांसाठी रद्द केले जातील. डॉ. मनमोहन सिंग यांचे राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते आणि 2004 ते 2014 दरम्यान त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली.
त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. ते एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ होते, ज्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर होती. त्यांचं देशाच्या विकासातील योगदान हे अमूल्य होत आणि त्यांचा विसर कोणालाही पडणार नाही.