जालना : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगेंनी माघार घेतली. अवघ्या पाच दिवसांत मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. राज्य शासन १३ ऑगस्टपर्यंत काय करते याची वाट बघणार नंतर पुढील निर्णय घेणार, असे जरांगेंनी जाहीर केले.